कोरोनाबाधित रुग्णांची सर्वांनी सेवा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:40+5:302021-06-21T04:25:40+5:30

मसूर: माझा माणूस जगला पाहिजे या उदात्त भावनेतून विलगीकरण केंद्रामध्ये समाविष्ट झालेल्या रुग्णांची सेवा आरोग्य यंत्रणेबरोबर त्याच्या कुटुंबीयांनी आणि ...

Coronary artery disease should be served by all | कोरोनाबाधित रुग्णांची सर्वांनी सेवा करावी

कोरोनाबाधित रुग्णांची सर्वांनी सेवा करावी

मसूर: माझा माणूस जगला पाहिजे या उदात्त भावनेतून विलगीकरण केंद्रामध्ये समाविष्ट झालेल्या रुग्णांची सेवा आरोग्य यंत्रणेबरोबर त्याच्या कुटुंबीयांनी आणि जवळपासच्या नागरिकांनीही कोरोना नियमाचे पालन करून आपली सेवाभाव वृत्ती जोपासावी, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले.

हेळगाव, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत संभाव्य कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड तालुका पंचायतीचे सदस्य रमेश चव्हाण, हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख, सरपंच शारदाताई जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी, माजी सरपंच बाळकृष्ण जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक संकपाळ, कॅप्टन नारायण सूर्यवंशी, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद सूर्यवंशी, अशोक चव्हाण, ग्राम विकास अधिकारी मनीष पाटील, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कुंभार, रेखा भोसले यासह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी सरपंच बाळकृष्ण जाधव यांनी प्रास्ताविक तर संदीप जगदाळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ : हेळगाव, ता. कऱ्हाड येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी मानसिंगराव जगदाळे, रमेश चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Coronary artery disease should be served by all