corona virus -दुबईवरून आलेली महिला कोरोना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:49 IST2020-03-23T14:23:00+5:302020-03-23T20:49:20+5:30

दुबई येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी दिली.

corona virus - A woman from Dubai suspects Corona | corona virus -दुबईवरून आलेली महिला कोरोना संशयित

corona virus -दुबईवरून आलेली महिला कोरोना संशयित

ठळक मुद्देविलगीकरण कक्षात दाखल त्या आरोग्य कर्मचाऱ्याचा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा : दुबई येथून आलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी दिली.

बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा २४ वर्षीय मित्रालाही सर्दी व खोकला असल्याने त्यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अकरा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला १४ वर्षीय युवकाचा घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री एक वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

यापूर्वी चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, रात्री दाखल केलेल्या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्यातील एन. आय. व्ही. कडे पाठविण्यात आला आहे.

Web Title: corona virus - A woman from Dubai suspects Corona