corona virus : पाटण तालुक्यात आणखी दहा बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:37 IST2020-11-11T19:37:25+5:302020-11-11T19:37:58+5:30
पाटण तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील दहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

corona virus : पाटण तालुक्यात आणखी दहा बाधित
रामापूर : पाटण तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील दहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत तालुक्यात एकूण १ हजार ८४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी तब्बल १ हजार ५०५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत १०६ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सध्या २२९ बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री आलेल्या कोरोना अहवालात तालुक्यातील धामणी येथील ५७ वर्षीय पुरुष, नानेगाव येथील ३८ वर्षीय पुरुष, पाटण येथील ३४ व ३६ वर्षीय पुरुष, विहेतील ३६ वर्षीय पुरुष, तारळेतील ४८ व ५९ वर्षीय पुरुष, १० वर्षीय बालक, १० वर्षीय बालिका, आवर्डेतील ७० वर्षीय महिला अशा दहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी नव्याने आणखी एका व्यक्तीने कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.