corona virus Satara : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; उच्चांकी ९२२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:15 IST2021-04-07T16:13:31+5:302021-04-07T16:15:01+5:30
CoronaVirus Satara- सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून गत चोवीस तासात उच्चांकी नवे ९२२ रुग्ण आढळून आले असून यामध्ये पाच जणांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९३६ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ७० हजार १३७ इतकी झाली आहे.

corona virus Satara : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; उच्चांकी ९२२ नवे रुग्ण
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून गत चोवीस तासात उच्चांकी नवे ९२२ रुग्ण आढळून आले असून यामध्ये पाच जणांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९३६ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ७० हजार १३७ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. विशेषता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज तीनशेच्यावर बाधितांचे येणारे आकडे आता नऊशे च्यावर जाऊ लागले आहेत. त्याच बरोबर रुग्ण दगावण्याचे प्रमाणनही सातत्याने वाढत आहे.
गत चोवीस तासात बुधवारी आलेल्या ९२२ जणांचा अहवालामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील ५० वर्षीय पुरुष, फलटण येथील ४५ वर्षीय महिला, कोरेगाव, येथील ५० वर्षीय पुरुष, शेनोली, ता. कराड येथील ७० वर्षीय पुरुष, धावडवाडी, ता. आटपाडी जिल्हा सांगली येथील ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ७० हजार १३७ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ९३६ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ६१ हजार ९४८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या ६ हजार २५३ रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.