शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

corona virus -पुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:16 IST

पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देपुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती पोलीस पाटील, आशा वर्कर्सला नोंदीच्या सूचना

सातारा : पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा जिल्ह्यात परदेस वारी करुन तब्बल १८३ लोक आलेले आहेत. त्यापैकी ५८ लोक आधी आले. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. होम कॉरंटाईनमध्ये म्हणजे घरीच राहून उपचार सुरु ठेवण्यात आले. त्यांचा कॉरंटाईनचा कालावधी संपला आहे. तर आणखी १३३ लोकांना आयसोलेशन वॉर्ड तसेच होम कॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले आहे.

ज्यांचे वय ६0 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. १४ दिवस कॉरंटाईनवर ठेवणे जरुरीचे आहे.दरम्यान, लग्न सोहळ्यासंदर्भात जो आदेश काढला आहे, त्याबाबत कोणत्याही प्रकारे ढिल दिली जाणार नाही. लग्नासाठी १0 पेक्षा जास्त लोक गोळा असलेले दिसले त्यावर पोलिसांची करडी नजर असून विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

महाबळेश्वर, पाचगणीकडे जाणाऱ्य ट्रॅव्हल्स रद्द करण्याचे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी ट्रॅव्हल्स मालकांना दिले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कोरोनाचा मॅप व्हॉटसअपच्या माध्यमातून फिरतो आहे. उत्सुकतेपोटी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपली फसवणूक होऊ शकते, असे आवाहन केले.तिटकारा नको...माणुसकी दाखवाकोरोनाचा प्रादुर्भाव झालेले अथवा जे लोक संशयित आहेत, ते चुकीच्या वेळी चुकीच्या देशामध्ये गेले होते. त्यातून त्यांना संसर्ग झालेला आहे. त्यांना १४ दिवस कॉरंटाईनवर ठेवण्यात येत आहे. संबंधित व्यक्तिंचा अथवा त्यांच्या कुटुंबांचा तिटकारा न करता माणुसकी दाखवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले आहे.स्टँपधारक आढळला तर तत्काळ कळवापरदेशातून आलेल्या व्यक्तिंच्या तसेच कोरोना संशयित रुग्णांच्या हातावर स्टँप लावण्यात आले आहेत. अशा रुग्णांनी घराबाहेर फिरणे अपेक्षित नसून ते अधिक चिंतेची बाब ठरु शकते. लोकांनी याबाबत प्रशासनाला तत्काळ माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले.अफवा अन दाखल गुन्हे

  • व्हॉटसअपवरुन सर्दी, खोकल्यावर ९ रुपयात उपचाराचे आमिष दाखविणाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा
  • कोरोना संशयित रुग्णांची नावे समाजमाध्यमांवर फिरविणाऱ्यावर गुन्हे
  • सातारा क्लबवर लोक एकत्रित जमले म्हणून गुन्हा दाखल
  •  पुसेगाव, दहिवडीतही अफवाप्रकरणी ५0५/ब अंतर्गत गुन्हा
  •  पाचगणी, महाबळेश्वरात विदेशी नागरिकांची माहिती दडविणाऱ्या हॉटेल मालकांवर गुन्हे
  • खोेजेवाडीत विवाह सोहळा ४00 ते ५00 लोक हजर गुन्हा दाखल
  •  ढेबेवाडी (ता. पाटण) सात लोक एकत्र जमले गुन्हा दाखल
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर