corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा १९७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:35 IST2020-08-12T16:35:09+5:302020-08-12T16:35:58+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून, बुधवारी आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १९७ वर पोहोचला आहे. दिवसागणिक मृतांचा आकडा वाडत असल्याने जिल्हा प्रशासनही हादरून गेले आहे.

corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा १९७ वर
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून, बुधवारी आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १९७ वर पोहोचला आहे. दिवसागणिक मृतांचा आकडा वाडत असल्याने जिल्हा प्रशासनही हादरून गेले आहे.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री २६१ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले तर पाचजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कंधारवाडी, ता. कऱ्हाड येथील ५५ वर्षीय पुरुष, कऱ्हाडमधील विठ्ठलनगरातील ५१ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील ८४ वर्षीय महिला त्याचबरोबर वाजेगाव, ता. पाटण येथील ७२ वर्षीय महिला, कऱ्हाडमधील शनिवार पेठेतील ३० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी रात्री आलेल्या २६१ अहवालामध्ये सर्वाधिक कऱ्हाड तालुक्यामध्ये तब्बल १२६ रुग्ण बाधित आढळून आलेत. त्याखालोखाल पाटण तालुक्यात २९ रुग्ण आढळून आले. तसेच सातारा-२७, वाई-६, फलटण-११, कोरेगाव-७, खंडाळा-६, माण-२, महाबळेश्वर-१, खटाव-३, जावळी-१ आणि वाळवा -२ कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.