शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

corona virus : आॅक्सिजन मशीन घेण्याकडे वाढतोय कल, आरोग्य तपासणी घरच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 1:39 PM

कोरोनावर प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्याला यश येत असून आॅक्सिजन यंत्र घेण्याकडे कल वाढला असून घरच्या घरीच प्रत्येकजण आॅक्सिजन लेवल तपासली जात आहे.

ठळक मुद्देआॅक्सिजन मशीन घेण्याकडे वाढतोय कल, आरोग्य तपासणी घरच्या घरीकोरोना होऊच नये म्हणून प्रत्येक घरात जनजागृतीला यश

वेळे : कोरोना परदेशातून देशात, देशातून राज्यात, राज्यातून जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून वाडीवस्तीपर्यंत पोहोचला. कोरोनावर औषध अजून तरी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्याला यश येत असून आॅक्सिजन यंत्र घेण्याकडे कल वाढला असून घरच्या घरीच प्रत्येकजण आॅक्सिजन लेवल तपासली जात आहे.या रोगामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्व दवाखाने खचाखच भरलेले आहेत. दवाखान्यात बेड शिल्लक नाहीत. आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवत आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. अशा सर्व प्रकारांमुळे रुग्णाला आवश्यक असणारा आॅक्सिजन गरजेनुसार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावतात.

असे घडू नये म्हणून आता बाजारात अनेक प्रकारच्या आॅक्सिजन निर्माण करणाऱ्या मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या मशीन विजेवर चालणाऱ्या असून सामान्य हवेतून आॅक्सिजन निर्माण करतात. तसेच वजनास हलक्या व आकाराने लहान असल्याने त्या कोणत्याही ठिकाणी नेता येऊ शकतात.व्हेंटिलेटरसाठी उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. गावोगावी रुग्णांचे वाढते प्रमाण असल्याने सर्वच ठिकाणी चिंतेचे वातावरण आहे. कधी कोणते गाव पुढे निघून जाईल हे सांगणे कठीण झाले आहे. खबरदारी म्हणून आॅक्सिजन मशीन घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.

ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे अशा लोकांनी या मशीन व्यक्तिगतरित्या खरेदी केल्या आहेत. तसेच गावातील अनेक तरुण, मंडळे, संस्था यांनी एकत्र येत लोकसहभागातून या मशीन खरेदी केल्या आहेत. त्याचा उपयोग गावकऱ्यांना होताना दिसत आहे. अजूनही या मशीन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढल्याचा दिसत आहे.वेळ अन् खर्च वाचण्यास मदतरुग्णांना आधार ठरणाऱ्या या मशीन प्रत्येक गावात असल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरजवंताला लगेचच आॅक्सिजन मिळाल्याने त्याचा जीव वाचू शकणार आहे. शिवाय त्याचा होणारा खर्च व वेळही वाचणार आहे. तातडीने आॅक्सिजन मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात या मशीन उपलब्ध करण्यासाठी तरुण पिढी पुढे येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर