corona virus : जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढतोय; आणखी बारा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:26 IST2020-11-27T20:25:09+5:302020-11-27T20:26:26+5:30
coronavirus, sataranews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, बुधवारी आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६९९ वर पोहचला आहे. दिवसागणिक मृतांचे वाढते आकडे पाहून जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे.

corona virus : जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढतोय; आणखी बारा जणांचा मृत्यू
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, बुधवारी आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६९९ वर पोहचला आहे. दिवसागणिक मृतांचे वाढते आकडे पाहून जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री २४८ बाधित रुग्ण आढळून आले असून, यामध्ये तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आरफळ, (ता. सातारा) येथील ८८ वर्षीय पुरुष, नागठाणे, (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, तारळे, (ता. पाटण) येथील ६५ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ सातारा येथील ५३ वर्षीय पुरुष, शिरंबे, (ता. कोरेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष, वडूज, (ता. खटाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, म्हसवे वर्ये, (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, संभाजीनगर, (ता. खंडाळा) येथील ८५ वर्षीय पुरुष, कोळकी, (ता. फलटण) येथील ३८ वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर, (ता. फलटण) येथील ८१ वर्षीय पुरुष, सांगवी, (ता. जावळी) येथील ६८ वर्षीय पुरुष, म्हसवड, (ता. माण) येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, आतापर्यंत ४७ हजार ३८६ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दिवाळीनंतर तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी होऊ लागली आहे. अनेकजण टेस्ट करून घेत आहेत. दिवाळीमध्ये खरेदीच्या निमित्ताने अनेकजण घराबाहेर पडले होते. एकमेकांचा संपर्क आल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.