सातारा : कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही जिल्हा बंदीचा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करत पुणे व मुंबईतून विनापरवानगी प्रवास करुन आलेल्या आरफळ व मालगाव, ता. सातारा येथील ११ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ ते १७ जून या कालावधीत मालगाव, ता. सातारा येथे सचिन प्रकाश ढाणे (रा. पुणे), शामराव जनार्दन दळवी, मंजुळा शामराव दळवी, सचिन शामराव दळवी, अंकिता सचिन दळवी (सर्व रा. धारावी, मुंबई), तसेच संपत पांडुरंग कुंभार, रेखा संपत कुंभार (रा. डोंबवली), फिरोज हमीत शेख, सलमा फिरोज शेख, समीर युसूफ शेख (रा. मुंबई) हे सर्वजण विनापरवानगी आरफळ व मालगाव येथे आले.
याबाबत पोलिसांना समजल्यानंतर हवालदार महेश कदम यांनी संबंधितांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.