corona virus -कोरोना संशयित युवक विलगीकरण कक्षात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 17:05 IST2020-03-21T16:59:10+5:302020-03-21T17:05:31+5:30

चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा संशयित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे.

corona virus - Corona suspect young man enters detention room | corona virus -कोरोना संशयित युवक विलगीकरण कक्षात दाखल

corona virus -कोरोना संशयित युवक विलगीकरण कक्षात दाखल

ठळक मुद्देकोरोना संशयित एक युवक शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखलचिलीतून आलेल्या ३४ वर्षीय युवकाच्या प्राथमिक तपासण्या

सातारा : चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा संशयित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे.

त्याला सर्दी असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Web Title: corona virus - Corona suspect young man enters detention room