corona virus : जिल्ह्यात एका बाधितासह सारीच्या रुग्णाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:18 IST2020-06-26T18:17:02+5:302020-06-26T18:18:55+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी आणखी एका बाधित रुग्णाचा आणि सारीच्या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा ४१ वर तर बाधितांचा ८८८ वर पोहोचला आहे.

corona virus : जिल्ह्यात एका बाधितासह सारीच्या रुग्णाचाही मृत्यू
सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी आणखी एका बाधित रुग्णाचा आणि सारीच्या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा ४१ वर तर बाधितांचा ८८८ वर पोहोचला आहे.
कऱ्हाड येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये ७० वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित रुग्ण पाटण तालुक्यातील सदा दाढोलीमधील आहे.
दरम्यान, वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ६२ वर्षीय पुरुषाला सारीची लक्षणे असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या रुग्णाचाही रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच पुणे व कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेज येथून १०६ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.