पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:23+5:302021-04-06T04:38:23+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण ...

Corona vaccine taken by Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर प्रकाश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या उपस्थितीत कोरोना लस त्यांना देण्यात आली.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत त्यांचे बंधू अधिकराव चव्हाण आणि त्यांचे केअर टेकर नामदेव चन्ने अशा तीन जणांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर त्यांना ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस २८ दिवसांनी दिली जाईल. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासोबत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाडचे नगरसेवक राजेंद्र माने, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

अधीक्षक शिंदे यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी चव्हाण यांनी कोविड लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करत लसीकरण केंद्राची पाहणी केली. अधीक्षक शिंदे यांच्याकडून कोविड लसीकरणाची आतापर्यंतची माहिती घेतली.

फोटो :

Web Title: Corona vaccine taken by Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.