श्री समर्थ हायस्कूलमध्ये कोरोना चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:07+5:302021-06-23T04:25:07+5:30
मसूर : श्री समर्थ हायस्कूल कालगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चाचणी ...

श्री समर्थ हायस्कूलमध्ये कोरोना चाचणी शिबिर
मसूर : श्री समर्थ हायस्कूल कालगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. या वेळी डॉ. टी. डी. सानप, सरपंच संगीता चव्हाण, तलाठी नंदकुमार शिंदे, ग्रामसेवक विशाल मोहिते, मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार, पोलीस पाटील अमित वारे उपस्थित होते.
शिबिरात हायस्कूलचे कर्मचारी व ग्रामस्थ मिळून तीस जणांची ॲन्टिजेन व सोळा जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. यामध्ये सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय तावरे, रुपाली कुंभार, तसेच हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिर यशस्वितेसाठी आरोग्यसेवक आर. एस. बोंद्रे, परवेज मणेर, जितेंद्र पवार, तुषार निकम आदींनी परिश्रम घेतले.
फोटो २२मसूर
कालगाव ता. कऱ्हाड येथील श्री समर्थ हायस्कूलमध्ये कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. या वेळी डॉ. सतीश देशमुख, डॉ. टी. डी. सानप, आर. एस. बोंद्रे, जितेंद्र पवार उपस्थित होते. (छाया : जगन्नाथ कुंभार)