मलकापुरात विनाकारण फिरणाऱ्या सोळाजणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:33+5:302021-05-30T04:30:33+5:30
दोघा संशयितांना विलगिकरणात दाखल पालिकेच्या फिरत्या पथकाची धडाकेबाज कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी ...

मलकापुरात विनाकारण फिरणाऱ्या सोळाजणांची कोरोना चाचणी
दोघा संशयितांना विलगिकरणात दाखल
पालिकेच्या फिरत्या पथकाची धडाकेबाज कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत शनिवारी पाचव्या दिवशी फिरत्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. शहरात विनाकारण फिरणाऱ्या सोळा नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. त्या सोळाजणांपैकी दोन संशयितांना पार्ले येथील विलगीकरणात दाखल करण्यात आले. ध्वनिक्षेपक वाहनासह रुग्णवाहिकेतून शहरातील सर्व विभागात गस्त घालत ही कारवाई करण्यात आली.
येथील पालिकेच्या वतीने शहरात येणारे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मलकापूरचे मुख्य प्रवेशद्वार मलकापूर फाटा, शिवछावा चौक व बैलबाजार रस्ता या ठिकाणी बॅरिकेड लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, बैलबाजार रोडसह ९ ठिकाणी व शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. या ठिकाणी दिवसभर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी तळ ठोकून होते. मात्र, पाचव्या दिवशी शनिवारी पालिकेच्या फिरत्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली.
पालिकेच्या ध्वनिक्षेपक वाहनासह रुग्णवाहिकेतून शहरातील सर्व विभागात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी शहरात विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या सोळा नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. या १६ जणांपैकी दोघेजण कोरोनासदृश संशयित आढळले. त्या दोघांना पालिकेच्या रुग्णवाहिकेतून पार्ले येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले, तर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच येथील कालिदास मार्केट परिसरातील कोहिनूर ताडपत्री विक्री करणाऱ्या दुकानदाराने नियमांचे उल्लंघन करत दुकान सुरू असल्याचे निदर्शनास आले. वारंवार सूचना देऊनही नियम मोडल्याप्रकरणी संबंधित दुकानावर कारवाई करीत सील करण्यात आले.
या पथकात वाहनांसह वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे, रामभाऊ शिंदे, सोमाजी गावडे, विजय जाधव, बालाजी माने, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले होते.
फोटो २९मलकापूर
मलकापूर येथे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या आदेशाने ज्ञानदेव साळुखे यांच्या पथकासह काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना चाचणी केली. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
290521\img_20210529_163028.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्या आदेशाने ज्ञानदेव साळुखे यांच्या पथकासह काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणारांची अॉन द स्पॉट कोरोना चाचणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)