corona in satara -प्रलंबित ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नव्याने तीन रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:25 IST2020-04-13T11:22:18+5:302020-04-13T11:25:53+5:30
कोरोनाच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या ४८ अहवालापैकी 30 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी ३ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत.

corona in satara -प्रलंबित ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नव्याने तीन रुग्ण दाखल
सातारा : कोरोनाच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी ३ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत.
जिल्हा रुग्णालय सातारा येथे १३ व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या १ अशा एकूण १४ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर घेण्यात आलेल्या कराड-६, फलटण-६ कोरेगाव-१, वाई-३ असे एकूण १६ कोविड-१९ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे काल दि.१२ एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे ३ नागरिकांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ३ जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.