Corona in satara: कोरोना मुक्त महिलेला सातारा जिल्हा रुग्णालयाने सोडले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 18:22 IST2020-04-08T18:12:02+5:302020-04-08T18:22:33+5:30

सातारा जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या पहिल्या महिला रुग्णाला आज घरी सोडण्यात आले.

Corona in satara: Corona-free woman leaves home at Satara District Hospital | Corona in satara: कोरोना मुक्त महिलेला सातारा जिल्हा रुग्णालयाने सोडले घरी

Corona in satara: कोरोना मुक्त महिलेला सातारा जिल्हा रुग्णालयाने सोडले घरी

ठळक मुद्देकोरोना मुक्त महिलेला सातारा जिल्हा रुग्णालयाने सोडले घरीडॉक्टरांचे मानले आभार

सातारा : सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना ( कोविड 19 ) बाधित महिला झाली ठणठणीत बरी.

कोरोना मुक्त जिल्ह्यातली पहिली रुग्ण...  पुष्प गुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयातून निरोप दिला...कोरोना मुक्त महिलेने रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स  यांचे यावेळी आभार मानले . 


हा निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, डॉ.धुमाळ, डॉ. बक्षी,  डॉ. जाधव, डॉ. देशमुख, डॉ.सुपेकर, डॉ.हिरास,  मेट्रोन श्रीमती चव्हाण यांच्या नर्सिंग स्टाफ, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Web Title: Corona in satara: Corona-free woman leaves home at Satara District Hospital