corona in satara-सातारकरांना दिलासा; 64 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:09 IST2020-04-10T12:07:23+5:302020-04-10T12:09:40+5:30
सातारा जिल्हा रुग्णालय व कृष्णा मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

corona in satara-सातारकरांना दिलासा; 64 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
सातारा : सातारा जिल्हा रुग्णालय व कृष्णा मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवातील तसेच श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे अशा विविध आजारांमुळे 64 अनुमानित रुणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या 64 अनुमानित रुग्णांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपसणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व 64 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले.
यामध्ये सातारा जिल्हा रुग्णालयातील 12 पुरुष व 8 महिलांचा तर कृष्णा मेडिकल हॉस्पिटलमधील 16 महिला व 7 महिन्याच्या बालिकेचा आणि 27 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन आणि कराडमध्ये दोन अशा चार कोरोना बाधित रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.