corona in satara : १४ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह, १२ जणांचे नमुने पुणे येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:55 IST2020-04-20T14:24:50+5:302020-04-20T14:55:58+5:30
कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 11 आणि उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

corona in satara : १४ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह, १२ जणांचे नमुने पुणे येथे
ठळक मुद्दे १४ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह१२ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे पुनर्तपासणीसाठी दाखल
सातारा : कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 11 आणि उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा दहा नागरिकांना बाधित रुग्णाचे सहवासित म्हणून 14 दिवसानंतरच्या पुनर्तपासणीसाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथे प्रत्येकी एक नागरिक अशा एकूण १२ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.