जिल्ह्यात कोरोनाने आणखी तिघांचा मृत्यू,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:49+5:302021-04-01T04:39:49+5:30
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून गत चोवीस तासात नवे ३८३ रुग्ण आढळून आले असून यामध्ये तिघांचा बळी ...

जिल्ह्यात कोरोनाने आणखी तिघांचा मृत्यू,
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून गत चोवीस तासात नवे ३८३ रुग्ण आढळून आले असून यामध्ये तिघांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९०६ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ६५ हजार ५४२ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषता गत आठवड्यापासून ही संख्या आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज तीनशेच्यावर बाधितांचे येणारे आकडे आता चारशेच्या वर जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर अधून-मधून रुग्ण दगावत आहेत.
रविवारी ४७४ तर सोमवारी ४०७ असे एकूण ८८१ नवे रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही अहवालामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र बुधवारी आलेल्या ३८३ जणांचा अहवालामध्ये तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वाई येथील ५१ वर्षीय पुरुष, गोपुज तालुका खटाव येथील ५५ वर्षीय महिला आणि झोरे, ता जावळी येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये सातारा, खटाव, फलटण आणि कराड तालुक्याचा समावेश आहे. यात सातारा तालुक्यामध्ये सर्वाधिक १०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच फलटण तालुक्यामध्ये ६१ आणि कराड तालुक्यामध्ये १९ रुग्ण तसेच खटाव १८, जावळी तालुक्यात २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ६५ हजार ५४२ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ९०६ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ५९ हजार ९९७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या ३ हजार ६३९ रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.