कोरोनाने हिरावले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST2021-06-11T04:26:38+5:302021-06-11T04:26:38+5:30

सातारा : कोरोना महामारी अनेक संकटे घेऊन आली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही ...

The corona deprived hundreds of women of kumkum on their foreheads | कोरोनाने हिरावले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू

कोरोनाने हिरावले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू

सातारा : कोरोना महामारी अनेक संकटे घेऊन आली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही कुटुंबे सावरण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील २ हजार ३९९ पुरुषांना जीव गमवावा लागला. यामध्ये घराची जबाबदारी असणारे कर्ते पुरुषच मोठ्या संख्येने होते. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बहुतांशवेळा कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊन पडते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तत्काळ नोकरी किंवा कुठला व्यवसाय मिळणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम या योजनांमध्ये अशा महिलांची नावे घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात येते.

असा करा अर्ज...

जिल्हा महिला, बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील आशा कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. अजून देखील याचा सर्व्हे सुरू असून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येत आहे. महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावोगावी जाऊन याची माहिती घेत आहेत. तरीदेखील या योजनेपासून कोणी वंचित राहू नये, या उद्देशाने घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला असल्यास त्याची माहिती महिला बाल विकास विभागाला द्यावी. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे

जिल्ह्यातील एकूण बाधित :

बरे झालेले रुग्ण :

उपचार सुरू असलेले रुग्ण :

महिला रुग्ण : ९००

२ हजार ३९९ महिलांना केले निराधार

१) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये २ हजार ३९९ पुरुष रुग्णांना जीव गमवावा लागला

२) घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाला सावरताना महिलांची होरपळ होत आहे

३) अनेक महिलांच्या घरामध्ये सासरे, सासू तसेच लहान मुले देखील असल्याने या महिलांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

४) शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांना आपल्या पायावर उभे राहता येऊ शकते, किमान कुटुंब सावरण्यासाठी कुटुंब आहे, त्यांची भूक भागवण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.

कोट..

कोरोना महामारीमुळे शेकडो महिलांना कुटुंब सावरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्या महिलेचा पती कोरोनामुळे गेला, अशा महिलांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी तसेच नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीमच्या माध्यमातून अशा महिलांना मदत देण्यात येत आहे.

- रोहिणी ढवळे

जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी

Web Title: The corona deprived hundreds of women of kumkum on their foreheads