शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीच्या जिल्ह्यात सहकार धोक्यात !

By admin | Updated: December 5, 2014 23:27 IST

अनेक गैरव्यवहार : भ्रष्टाचार कळीचा मुद्दा; सूत्रधारांचा शोध महत्त्वाचा

संजय कदम - वाठार स्टेशन -सहकाराची क्रांती झालेल्या सातारा जिल्ह्यातला सहकार आज खासगीकरणाच्या वाटेवर आहे. सहकार जोपासला तरचं शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल. जिल्हा बँकेच्या अधिपत्याखालील विकास सेवा सोसायट्यांमधील भ्रष्टाचार हाच आज कळीचा मुद्दा ठरला असून जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात करोडोंचा गैरव्यवहार झाला. या सोसायट्या आता धोक्यात आल्या आहेत. या गैरव्यवहारामागे नक्की कोण ? याचा शोध घेणं गरजेचं आहे.
ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाने हलगर्जीपणा केला तर त्याची शिक्षा सरपंचांना भोगावी लागते. सोसायटीत सचिवाने गैरव्यवहार केला तर त्याची शिक्षा संचालक मंडळ, चेअरमनला भोगावी लागते. मग जिल्हा बँकेचे विकास अधिकारी दोषी असले तर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ दोषी का ठरूव नये ? हा नियम सर्वांसाठीच सारखा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
देऊर-दहिगाव विकास सेवा सोसायटीत दुबार कर्जाचा आकडा ५५ लाखांच्या घरात आहे. दुबार कर्ज म्हणजे पहिले घेतलेले कर्ज परतफेड केल्यानंतर दुसऱ्यांदा कर्ज पुरवठा करणे याची सर्व जबाबदारी जिल्हा बँकेच्या विकास अधिकाऱ्यांची असते. देऊर, दहिगाव सेवा सोसायटीमध्ये पहिली कर्ज फेड केली नसताना दुसरी कर्जे कशी देण्यात आली. याशिवाय कर्ज देताना त्या शेतकऱ्याला कमाल मर्यादा ठरवून दिलेली असते. मात्रे हे सर्वच नियम या सोसायटीत ढाब्यावरचं बसवले आहेत.
सचिवाने या सोसायटीत शेतकऱ्यांच्या विश्वास घात करीत अनेकांच्या खोट्या सह्या करून परस्पर व्यवहार फिरवले आहेत. तर बँकेच्या स्लिपवरही शेतकऱ्यांकडून सह्या घेतल्याने आता शेतकरीही अडचणीत आले आहेत. सहकार क्षेत्रात लागलेल्या या गालबोटामुळे भविष्यात सहकारी सेवा सोसायट्यांचे अस्तित्वचं धोक्यात येणार आहे. सचिव, लेखा परीक्षक, विकास अधिकारी यांच्या गलथानपणाची शिक्षाच संचालक मंडळाला भोगावी लागत आहे. भविष्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकात सोसायट्यांचे सदसत्व सुध्दा नको अशीच धास्ती आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दोषींना कठोर शिक्षाच व्हावी...
चोर सोडून संन्याशालाच फाशी होत असल्याने सहकारी संस्थांच्या बाबतीत कुठेतरी जागृत भूमिका घ्यावी. जे खरेच दोषी आहेत. त्या सर्वांनाच कठोर शासन झाले तरच या सोसायट्यांचे अस्तित्व भविष्यात राहील, असे सांगण्यात येत आहे.