‘कन्टेम्पररी’ नृत्याविष्कार ते ‘टॉलिवूड’
By Admin | Updated: January 13, 2015 00:17 IST2015-01-12T21:29:53+5:302015-01-13T00:17:25+5:30
लाइव्ह स्टेज शो : पंकज चव्हाण अॅकॅडमीच्या नृत्यप्रकारांनी सातारकरांना धरायला लावला ठेका

‘कन्टेम्पररी’ नृत्याविष्कार ते ‘टॉलिवूड’
सातारा : ‘मोरया-मोरया’पासून ‘रेशमाच्या रेघांनी’पर्यंत आणि ‘कन्टेम्पररी’ आकृतिबंधांपासून थेट ‘टॉलिवूड’पर्यंत... एकसे एक धमाकेदार परफॉर्मन्स. उसळतं संगीत आणि त्यावर सातारकरांच्या पावलांनी धरलेला ठेका. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली नृत्यरजनी रंगतच गेली.. रात्री पावणेअकरापर्यंत! पंकज चव्हाण अॅकॅडमीच्या डान्स वर्कशॉपमध्ये सिद्धेश पैने मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘लाइव्ह स्टेज शो’ शाहू कलामंदिरात रंगला. क्षणाक्षणाला हसविणाऱ्या डी. महेश यांच्या निवेदनाने तो आणखी खुलला. प्रारंभी स्वप्नील आणि अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना गायिली. नंतर ‘मोरया मोरया’ हा नृत्याविष्कार झाला. नंतर ‘इंडियावाले’ गाण्यावर थिरकणाऱ्या बालचमूला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘रेशमाच्या रेघांनी’ लावणीने ‘वन्समोअर’ घेतला. ‘मला वेड लागले’ गाण्यावर कन्टेम्पररी नृत्याविष्कार सादर झाला. अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या ‘मम्मींच्या, ‘मनवा लागे’ आणि ‘तितली बन के दिल उडा’ या नृत्यांना प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात दाद दिली. मेहेरबाँ, जुम्मे की रात, धतिंग नाच यांसारख्या एकसे बढकर एक गाण्यांवर नृत्ये सादर झाली. ‘जय मल्हार’ मालिकेच्या शीर्षकगीतावरील नृत्याला विशेष प्रतिसाद लाभला. पंकज चव्हाण यांनी डोळे बांधून सादर केलेल्या कन्टेम्पररी नृत्याला प्रेक्षकांनी उभे राहून प्रतिसाद दिला. शेवटी ‘डीआयडी’फेम सिद्धेश पैने सादर केलेल्या नृत्यावर प्रेक्षक फिदा झाले. (प्रतिनिधी)
मान्यवरांची उपस्थिती
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नटराजाचे पूजन करण्यात आले. बँक आॅफ महाराष्ट्रचे केदार स्वामी, थोरात, हॉटेल राधिका पॅलेसचे दीपक पाटील, अॅम्बिशन क्लासच्या रूबी, दिलीप येळगावकर, विशाल ढाणे, सुमित साठे, सारंग गुजर, प्रदीप चव्हाण, नितीन दीक्षित, समृद्धी जाधव, राजू घुले, पोदारचे प्राचार्य साहू, निर्मला कॉन्व्हेन्टच्या मिला ग्रीन, अरुण गोडबोले, सिद्धेश पै, पंकज चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.