शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: खंबाटकी घाटात कंटेनर अपघाताने आगडोंब, ब्रेक निकामी झाल्याने उताराने पाठीमागील कंटेनरला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:00 IST

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही

खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास एका कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर तो उताराने पाठीमागे असलेल्या कंटेनरवर आदळला. यावेळी टँकरच्या डिझेल टाकीला आग लागली. यामध्ये दोन्ही कंटेनरने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेने कपडे घेऊन जाणारा कंटेनर (जीजे २७ एक्स ६१९९) या गाडीचा रविवारी दुपारी एकच्या दरम्यान ब्रेक निकामी झाला. दत्त मंदिराजवळ वळणावर ट्रक मागे येऊ लागला. यावेळी पाठीमागून चारचाकी गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरवर येऊन धडकला.

या अपघातात डिझेल टाकी फुटल्याने केबीन व दुसऱ्या कंटेनरच्या पाठीमागील बाजूने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. सायंकाळी चार वाजेपर्यंत आग विझविणे सुरू होते.घाटात रांगा...खंबाटकी घाटात कंटेनरला आग लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. धुराचा लोट सर्वत्र पसरल्याने आणि कंटेनरला लागलेल्या आगीचा स्फोट होण्याच्या भीतीने इतर वाहने घाटात जागीच थांबली होती. मुळात या ठिकाणी रस्ता एकेरी असल्याने बाजूने वाहने जाणे शक्य होत नव्हते. घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहने बोगदा मार्गे जाऊ लागली.

त्यामुळे साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ लागला. यामुळेच बोगद्यापासून वेळे बाजूकडील महामार्गावर रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा सात किलोमीटर पेक्षाही जास्त होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातfireआग