संचारबंदी नियमांचे सातत्याने उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST2021-05-31T04:27:41+5:302021-05-31T04:27:41+5:30
सातत्याने उल्लंघन सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मेडिकल व रुग्णालय ...

संचारबंदी नियमांचे सातत्याने उल्लंघन
सातत्याने उल्लंघन
सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मेडिकल व रुग्णालय वगळता सर्व अत्यावश्यक सेवा दि. १ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, नागरिक व वाहनधारकांकडून संचारबंदी नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. अत्यावश्वक सेवेच्या नावाखाली बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, संबंधितांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
झुुडपांमुळे वाढला
अपघाताचा धोका
किडगाव : सातारा ते वर्ये मार्गावर असलेल्या वेण्णा नदी पुलावर झुडपांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. झुडपांमुळे समोरून येणारे वाहन नजरेस पडत नसल्याने या मार्गावर आतापर्यंत अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. झुडपे हटविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही झुडपे जैसे थे आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या
बंदोबस्ताची मागणी
सातारा : शहर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी आजवर अनेकदा केली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने ही बाब काही गांभीर्याने घेतलेली नाही. शहरातील माची पेठ, केसरकर पेठ, बोगदा परिसर या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे.