शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

काँग्रेसचा ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न, भाजपाचा आरोप :

By नितीन काळेल | Updated: February 9, 2024 17:45 IST

साताऱ्यातील पोवई नाक्यावर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध आंदोलन झाले.

सातारा : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी समाजात झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे. तसेच काॅंग्रेस ओबीसीत फूट पाडत आहे, असा आरोप करत भाजपने साताऱ्यात राहुल गांधी विरोधात निषेध नोंदवला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

साताऱ्यातील पोवई नाक्यावर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध आंदोलन झाले. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, संतोष कणसे, मनीषा पांडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा गौरी गुरव, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. रूपाली पाटील-बंडगर, सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, कऱ्हाड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, आप्पा कोरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर आदी उपस्थित होते.

भाजप ओबीसी माेर्चाचे जिल्हाध्यक्ष जंत्रे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झालेला नाही. सामान्य जातीत जन्म झाला आहे, असे चुकीचे वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले आहे. राहुल गांधी यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे.शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षणाविरोधात राहिली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनीही १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिफारशींना विरोध केला होता. तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही मंडल आयोगाला विरोध केलेला. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.

या निषेध आंदोलनात युवराज मोरकर, किशोर पंडित, रवी लाहोटी, फत्तेसिंह पाटणकर, सुनील भोसले, अमोल कांबळे, सनी साबळे, सुनील लाड, इम्तियाज बागवान, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, वैशाली टंगसाळे, चित्रा माने, हेमांगी जोशी, प्रिया नाईक, वनिता पवार, अश्विनी हुबळीकर, हेमलता पोरे, सुरेखा धोत्रे, विकास बनकर, मनोहर कदम, सागर पवार, संतोष कदम, अमोल माने, लिंबाजी सावंत, विनोद देशपांडे, दिलीप शेवाळे, आशिष सकुंडे, अमित भिसे, निवास अडसुळे, रोहित किर्दत, अक्षय भोसले, जयराज मोरे, सचिन साळुंखे, रविकिरण पोळ, महेंद्र कदम, यशराज माने, गौरव मोरे, विजय पोरे, प्रथमेश इनामदार, सुहास चक्के, दिगंबर वास्के, शैलेश संकपाळ, अंकुश लोहार, अमित काळे, पंकज खुडे, राहुल चौगुले आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपा