शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रस्ता नाही तर टोल नाही; आनेवाडी, तासवडे टोलनाक्यावर काँग्रेसचे आंदोलन, विनाटोल वाहने सोडली

By दीपक शिंदे | Updated: August 3, 2024 12:52 IST

मोदी-गडकरींच्या खिशातील पैसा आहे का?, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा संतप्त सवाल

उंब्रज/भूईंज : खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्रसरकारने दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तासवडे टोलनाका येथे केला. दरम्यान, गेली ३ तास टोलनाक्यावरून आंदोलकांनी वाहने फ्री सोडून आंदोलन सुरूच ठेवलेले आहे.तासवडे टोलनाका येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने टोलबंद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवराज मोरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे. म्हणून त्यांना ठेका दिला आहे. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पंधरा वीस टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे उप ठेका डीपी जैन यांना दिले असून गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे.आनेवाडी टोलनाक्यावरही काँग्रेसच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता महामार्गावरील वाहनांना कोणताही टोल न देता सोडण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, विराज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, सुनील माने, राजकुमार चौगुले देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्याची दुरावस्था आणि पर्यायी मार्ग याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. स्थानिक लोकांना टोलमाफी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीची मागणीटोल संदर्भात अनेक अडचणी आहेत. याबाबत टोल व्यवस्थापनाला प्रश्न सोडविता येत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करुन योग्य तो मार्ग काढावा. आता आंदोलन झाले आणि नंतर पुढे काही होणार नाही या गैरसमजात राहू नये. जर टोल वसुली सुरु झाली तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गcongressकाँग्रेसagitationआंदोलन