शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे लोक पक्ष सोडून चाललेत, त्याला आम्ही काय करणार? - केंद्रीय मंत्री सोम प्रकाश

By प्रमोद सुकरे | Updated: August 30, 2022 18:55 IST

कराड : लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधी पक्ष बळकट असायलाच हवा; पण आज काँग्रेसचेच लोक पक्ष सोडून जायला लागले आहेत. ...

कराड : लोकशाही टिकून राहण्यासाठी विरोधी पक्ष बळकट असायलाच हवा; पण आज काँग्रेसचेच लोक पक्ष सोडून जायला लागले आहेत. स्वतःच तो पक्ष कमकुवत होत आहे. त्याला आम्ही काय करणार? असा सवाल केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केला. काँग्रेस नेस्तनाबूत  झाली आहे. प्रादेशिक पक्षही संपतील असे विधान त्यांनी केले होते. त्यावर माध्यमांनी त्यांना छेडले होते.कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सोम प्रकाश बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, रामकृष्ण वेताळ,धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.तयारी करण्यात चुकीचं काय?सातारा लोकसभा हा शिवसेनेच्या वाट्याचा आहे. मग मित्र पक्षांच्या मतदारसंघात भाजपची तयारी कशासाठी सुरू आहे? याबाबत विचारताच मंत्री सोम प्रकाश म्हणाले, निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. त्यावेळी कोणी उभं राहायचं हे ठरवता येईल. पण तयारी करण्यात चुकीचं काय आहे? असा सवाल त्यांनी केला. तर उमेदवार कोण असणार? याबाबत विचारतात माझ्या दोन्ही बाजूला व्यासपीठावर बसलेले सगळेच तगडे उमेदवार आहेत. पक्ष आदेश देईल तो शड्डू ठोकेल असे त्यांनी स्पष्ट केले.मंत्री  सोम प्रकाश म्हणाले, गेले दोन दिवस मी जिल्ह्यात दौरा केला. त्यात अत्यंत चांगला प्रतिसाद वाटला आहे. तर जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक चिन्हावर लढण्याचा आमचा प्रयत्न राहील असे यावेळी सांगितले.नरेंद्र पाटील नाराज नाहीत!माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते भाजपचे नेते आहेत. मात्र सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या या संपर्क अभियानात ते दिसत नाहीत .ते पक्षावर नाराज आहेत का? याबाबत विचारताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी ते नाराज नाहीत. फक्त पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे येथे उपस्थित नाहीत असे सांगितले.

इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हसवडलाच!सातारा जिल्ह्यात इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हसवड की कोरेगाव याबाबत दोन आमदारांच्यात सध्या वाद सुरू आहे? असा प्रश्न मंत्री सोम प्रकाश यांना विचारला. पण जयकुमार गोरे म्हणाले, इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हसवडला मंजूर आहे.  काहीजण व्यक्तिगत फायदा डोळ्यासमोर ठेवत त्याची कोरेगावला मागणी करत आहेत. पण त्यांचा हेतू सफल होणार नाही. असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना लगावला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपा