शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सातारा राहिला, पण माढा निसटला; शिलेदार गेले, पवार मैदानात उतरले...

By नितीन काळेल | Updated: October 19, 2023 19:04 IST

सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला साथ दिली. पण, १९९९ ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली.

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी पाच महिन्यांचा अवधी असून राष्ट्रवादी काँग्रेसने तयारीही सुरु केली आहे. यासाठी मुंबईत बैठकही झाली. यामध्ये सातारा आणि माढ्यासाठी अध्यक्ष शरद पवार स्वत: लक्ष घालणार आहेत. पक्षातील दुफळीनंतर अनेक शिलेदार सोडून गेले तरीही पवारांना आता निष्ठावंताची साथ आणि सोबतीला काँग्रेसला घेऊन ही खिंड लढवावी लागणार आहे.

सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला साथ दिली. पण, १९९९ ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळीपासून जिल्हा पवार यांच्या पाठिशी राहिला. पण, २०१९ च्या निवडणुकीदरम्यान बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघ जिंकलातरी माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. आतातर पक्षातच उभी फूट पडली. त्यामुळे दोन गटात पक्ष विभागल्याने सातारा राखायचाय तर माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवायचा आहे. यासाठीच मुंबईतील बैठकीत शरद पवार यांनी सातारा, माढ्यासाठी स्वत: लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.

सातारा लोकसभा मतदारसंघात१९९९ पासून राष्ट्रवादीचा खासदार निवडूण येत आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ लाही राष्ट्रवादीचेच उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे उदयनराजे यांच्यात जोरदार सामना झाला. तरीही उदयनराजे तिसऱ्यांदा खासदार झाले. मात्र, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने पोटनविडणूक झाली. यामध्ये भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील मैदानात होते. यामध्येही राष्ट्रवादीने बालेकिल्ला राखला. २००९ पासून माढा मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये सोलापूरमधील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. २००९ ला शरद पवार यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. २०१४ ला राष्ट्रवादीचेच विजयसिंह मोहिते-पाटील खासदार झाले. पण, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दारुन पराभव केला. आता शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षात दुफळी निर्माण केली आहे. यातून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातही दोन गट आहेत. यातून दोन्ही मतदारसंघात उमेदवार निवडूण आणायचे आहेत.

पक्षातील दुफळीनंतर राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. तरीही येणाऱ्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील ही पवार यांची पहिली पसंदी असणार आहे. पाटील हेही स्वत: मतदारसंघात फिरत असल्याने ते पुन्हा उमेदवार असतील असे संकेत आहेत. तसेच आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील यांचाही पर्याय असणार आहे. या मतदारसंघात पवार गटासाठी अनुकूल वातावरण आहे. पण, भाजपला हा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे. युतीत शिवसेनेकडे मतदारसंघ असलातरी मागील पोटनिवडणूक भाजपने लढविली. त्यामुळे भाजपचा उमेदवार असू शकतो. यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवार असू शकतात. तर युतीत अजित पवार गटाकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता कमी वाटते. कारण, भाजपने दीड वर्षांपासून मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे. यामध्ये शरद पवार यांना शिवसेनेचा ठाकरे गट आणि काॅंग्रेसची साथ मिळणार आहे. यावरच राष्ट्रवादीचे गणित अवलंबून असणार आहे.

माढ्यात शरद पवार गटाची ताकद कमी...माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार आहेत. या मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद कमी आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि फलटणचे आमदार दादा गटात आहेत. माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हेही दादांबरोबर आहेत. त्यामुळे शरद पवार या मतदारसंघात कसे फासे टाकतात यावर ही निवडणूक अवलंबून असेल. त्यातच सोलापूरच्या शिंदे बंधुंनी भाजप खासदार रणजितसिंह यांना दोन लाखांचे मताधिक्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युतीत अजित पवार गटाकडे मतदारसंघ न गेल्यास रणजितसिंह यांना निवडणूक थोडी सोपी होईल. मात्र, आघाडीत शरद पवार गटाकडे मतदारसंघ गेल्यास त्यांचा उमेदवार कोण हे सध्यातरी स्पष्ट नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसर