प्रत्येक गावातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:56+5:302021-03-28T04:36:56+5:30
सातारा : ‘सातारा आणि जावळी या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावात विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रत्येक गावातील प्रश्न मार्गी लावून ...

प्रत्येक गावातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
सातारा : ‘सातारा आणि जावळी या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावात विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रत्येक गावातील प्रश्न मार्गी लावून सर्वांगिण विकास साध्य केला आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे,’ असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
बेलावडे (ता. जावळी) येथील बौद्धवस्ती येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून साकव पुलासाठी २७ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर झाला आणि या पुलाचे काम पूर्ण झाले. या पुलाचे उद्घाटन आणि बौद्धवस्ती येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती जयदीप शिंदे, ‘आरपीआय’चे जावळी तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, सरपंच वनिता रोकडे, उपसरपंच अजय शिंदे, नितीन शिंदे, बापूराव गायकवाड, किसनराव रोकडे, सुभाष शिंदे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष दशरथ कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
‘साकव पुलाचे काम मार्गी लागले असून, आता बौद्ध वस्तीतील अंतर्गत रस्त्याचे कामही मार्गी लागले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथील स्मशानभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, संरक्षक भिंत आणि वेटिंग शेड ही कामेही लवकरच मार्गी लागतील.’ या कामांचे तातडीने इस्टिमेट करण्याच्या सूचनाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, आर्डे, बेलावडे ते मेरुलिंग रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावू आणि गावातील उर्वरित सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले.
२७जावळी
फोटो ओळ- बेलावडे (ता. जावळी) येथे साकव पुलाचे उद्घाटन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.