शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:30+5:302021-01-15T04:32:30+5:30

पाटण येथील कोयना शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोयना शिक्षण संस्थेचे जनरल ...

Committed to solving the problems of educational institutions | शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध

शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध

पाटण येथील कोयना शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संस्थेचे सदस्य संजीव चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. डी. पवार, डॉ. सी. यू. माने, महेंद्र भोसले उपस्थित होते.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ आहे. याठिकाणी शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्न आहेत. शाळांना सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे शिक्षण देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील परिस्थितीचा विचार करून शिक्षक व शिक्षण संस्थांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील, यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी शिक्षक मनोहर यादव, महेंद्र भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एम. जी. गिरीगोसावी यांनी आभार मानले.

फोटो : १४केआरडी०४

कॅप्शन : पाटणच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी आमदार जयंत आसगावकर यांचे भाषण झाले. यावेळी अमरसिंह पाटणकर, संजीव चव्हाण, डॉ. एस. डी. पवार उपस्थित होते.

Web Title: Committed to solving the problems of educational institutions