शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रस्त्याच्या कामाचा तिसऱ्यांदा फुटला नारळ !

By admin | Updated: November 10, 2015 23:50 IST

करंजेनाका-म्हसवे : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शाहूपुरीतील रस्त्याचा शुभारंभ

सातारा : करंजेनाका- म्हसवे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तिसऱ्यांदा नारळ फोडून करण्यात आला. यापूर्वी याच रस्त्याचा दोन वेळा नारळ फोडण्यात आला होता, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी केला.शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बनुगडे-पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पिलेश्वरीनगर येथे रस्त्याचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा युवा सेना अध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, चंद्रकांत जाधव, तालुका प्रमुख हरिदास जगदाळे, बी. ए. पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. पोरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.करंजेनाका-म्हसवे या रस्त्याचे काम बरेच दिवस रेंगाळलेले होते. या रस्त्याच्या कामासाठी अगोदरच दोनवेळा नारळ फुटले होते; मात्र कोणत्याही प्रकारे कामास सुरुवात झाली नव्हती, असे यावेळी सांगण्यात आले. प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘रस्त्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या फंडातून १५ लाखांचा निधी त्वरित उपलब्ध करून दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे शस्त्र आहे. एकदा बाण सुटला की, तो सुटला. तसेच एक शब्द सुटला की, तो पूर्ण करणे हेच शिवसेना आपले ध्येय समजते. या भागातील अडचणींसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,’ असेही त्यांनी सांगितले.म्हसवेचे सरपंच संजय शेलार याचे याकामी विशेष सहकार्य मिळाले आहे. कार्यक्रमास सुरेश चिंचकर, सतीश मोरे, सुरेश साळुंखे, संदीप झरेकर, सुनील भोज, आनंद सावंत, जयप्रकाश फरांदे, विलास पिसाळ, बोराटे, मेजर शेळके, दिनकर कामटे, मोहन कचरे, चंद्रकांत पोंडकर, सूर्यकांत कदम, शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पिल्लेश्वरी व म्हसवे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमार महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)