युतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
By Admin | Updated: July 7, 2015 01:21 IST2015-07-07T01:06:37+5:302015-07-07T01:21:41+5:30
आनंदराव पाटील : जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत टीकास्त्र

युतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
सातारा : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी शासनाने घेतलेल्या राबविलेल्या योजनांची नावे बदलून मोदी व फडणवीस सरकारने देशातील व महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला असून, युती सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका आमदार आनंदराव पाटील यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युती शासनाच्या कारभाराविरोधात शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, महाप्रदेश महिला काँगे्रस सरचिटणीस रजनी पवार, बाबासाहेब कदम, प्रमोद देशमाने, प्रल्हाद चव्हाण, मोहन भोसले, साहेबराव जाधव, राजाराम काळे, शिवाजीराव फडतरे, अशोकराव पाटील, भगवानराव आवाडे, नरेश देसाई, विजय भिलारे, धैर्यशील सुपले, रवींद्र झुटिंग, उमेश ताटे, राहुल घाडगे, डॉ. शंकरराव पवार, जितेंद्र भोसले, जयकुमार शिंदे, अमित जाधव, नंदकुमार निकम, सर्जेराव
जांभाळे, जिल्हा महिला काँगे्रसच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, कोरेगाव महिला काँगे्रसच्या अध्यक्षा
संजना जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, ‘या देशातील जनतेने मोठ्या अपेक्षेने मोदी-फडणवीस सरकारला निवडून दिले; परंतु केंद्रात व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले व महाराष्ट्रात भाजपा-युतीची सत्ता येऊन सहा महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी, थेट भरीव आर्थिक मदत, ऊसदराची समस्या आदी गंभीर प्रश्न आदी विषयांवर मोदी फडणवीस सरकारने जनतेचा मोठा विश्वासघात केला आहे. अशा दगाबाज सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.’ ैअसेही पाटील म्हणाले.
रवींद्र झुटिंग यांनी स्वागत केले. धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ताटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)