शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

कोयना @ ५० टीएमसी, इतर धरणांतही साठा वाढला, पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:28 PM

सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेमध्ये जवळपास ५० टीएमसी इतका साठा झाला होता. तर जिल्ह्यातील इतर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे.

ठळक मुद्देकोयना @ ५० टीएमसी, इतर धरणांतही साठा वाढलापश्चिम भागात पावसाचा जोर कायम

सातारा : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेमध्ये जवळपास ५० टीएमसी इतका साठा झाला होता. तर जिल्ह्यातील इतर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावल्यानंतर काही दिवसांची उघडीप वगळता पाऊस सतत होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम भागात सूर्यदर्शन झालेच नाही. सतत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळू लागले आहेत. धरणातही पाण्याची आवक वाढली असून, साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक साठा आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८६ तर एकूण १८५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ४९.८२ टीएमसी इतका साठा आहे. २४ तासांत धरणात ३८६७० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धोम धरण क्षेत्रात १३, कण्हेर १३, बलकवडी ५८, उरमोडी २० आणि तारळी येथे ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सातारा शहरातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना छत्री हातात घेऊन बाहेर पडावे लागले.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम १३ (१३३)कोयना ८६ (१८५३)बलकवडी ५८ (८८३)कण्हेर १३ (२९८ )उरमोडी २० (३७१)तारळी ३१(६१३)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर