शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:22 PM

शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली.

ठळक मुद्दे किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम हरणाई देवीच्या मंदिराशेजारी तलावातील झाडे-झुडपे हटविली

पुसेसावळी : शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली.सर्वात अगोदर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करून हरणाई देवी मंदिराशेजारीलतलावातील आणि कडेला असणारी अनावश्यक झाडेझुडुपे काढण्यात आली. तसेच त्या तलावातील कागद, प्लास्टिक, पत्रावळ तसेच इतर कचरा गोळा करण्यात आला. त्यासोबत टेहळणी बुरुजाकडील परिसर कचरा मुक्त करण्यात आला.अनावश्यक झाडे तोडून उपटून काढल्यानंतर त्यापासून पुन्हा फुटवे फुटू नयेत, यासाठी झाडांच्या मुळावर आणि न तोडलेल्या झाडाच्या बुंध्यावर रासायनिक पदार्थ्यांचा प्रयोग करण्यात आला .त्यानंतर सर्व नवीन मावळ्यांना एकत्र बसवून दुर्ग संवर्धन तसेच त्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. दुर्ग संवर्धन हे एकट्या-दुकट्याचे कार्य नसून ते सर्वांचे आहे. त्यात सर्वांचीच महत्वाची भूमिका आहे. हा ऐतिहासिक वारसा जपणे किती महत्वाचे आहे हे समजून सांगण्यात आले.आपल्या सर्वांवरच ही जबाबदारी आहे आणि ती कशी पार पाडावी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यात स्वत:चे योगदान जास्तीत जास्त कसे देता येईल, यासाठी प्रत्येक मावळ्यात नवीन उमेद जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी दुर्ग इतिहास व स्वराज्याची उद्दिष्टे यांचे स्पष्टीकरण करण्यात आले.दुर्ग भ्रमंतीत गडाचे काय महत्व आहे, हे स्पष्ट करण्यात आले आणि शेवटी प्रेरणा मंत्राच्या साहाय्याने सर्वांना हे कार्य अखंड चालू आणि स्वहस्ते करण्यास प्रेरित करून ही अभ्यासपूर्ण मोहीम पूर्णत्वास नेण्यात आली.

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर