बोगदा-कुरणेश्वर रस्त्याची स्वच्छता

By Admin | Updated: December 25, 2014 00:15 IST2014-12-24T21:59:20+5:302014-12-25T00:15:12+5:30

सातारच्या मैत्री प्रतिष्ठानचा उपक्रम

Cleanliness of Roads of Bawda-Kurneshwar | बोगदा-कुरणेश्वर रस्त्याची स्वच्छता

बोगदा-कुरणेश्वर रस्त्याची स्वच्छता

सातारा : मैत्री प्रतिष्ठान, साताराच्या माध्यमातून स्वच्छ सातारा मोहिमेचा प्रारंभ बोगदा ते कुरणेश्वर या भागाची स्वच्छता करून करण्यात आला.या मोहिमेंतर्गत दर रविवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच स्वच्छतेचे फायदे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. आजची मोहीम संकल्पक राजेंद्र चिकणे, शेखर मोटे, पाटेकर, चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल चिकणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे.
यामध्ये सिद्धार्थ चिकणे, अमोल वाघमळे, कुमार धनावडे, गणेश काकडे, समीर चिकणे, सावंत, विक्रांत पवार, आदित्य चिकणे, साईराज भोसले, करण देशमुख, विशाल रेवाळे, विनीत खरात, मयूर पाटील तसेच अन्य सभासदांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness of Roads of Bawda-Kurneshwar