परभणीतील स्वच्छतादूताकडून वाई बसस्थानकाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:23+5:302021-09-18T04:41:23+5:30
वाई : ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जतन करण्याची प्रतिज्ञा घेतलेले कमळाजी कावळे ऊर्फ (कावळे मामा) यांनी ...

परभणीतील स्वच्छतादूताकडून वाई बसस्थानकाची स्वच्छता
वाई : ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जतन करण्याची प्रतिज्ञा घेतलेले कमळाजी कावळे ऊर्फ (कावळे मामा) यांनी गेली सतरा वर्षे आईच्या वचनासाठी हाती घेतला झाडू तसेच सार्वजनिक स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. त्याची सुरुवात विठूमाऊलीच्या पंढरपुरातून केली. तेथून चालू झालेली ही स्वच्छतेची मोहीम ते आजही नि:स्वार्थपणे पार पडत आहेत. त्यांनी वाई एसटी आगारातील सर्व प्लॅटफॉर्मची साफसफाई केली. स्वच्छतेतून निरोगी आरोग्याचा संदेश दिला. जेथे जेथे प्रवास करतात तेथील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करत असतात. पुण्यातील संत गाडगेबाबा लाँड्रीधारक संघटना महाराष्ट्र यांनी त्यांच्या कामाची दखल घेत पुण्यामध्ये त्यांचा सत्कार सोहळा पार पाडला. यावेळी स्वारगेट बसस्थानकाची स्वच्छता करून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.
त्यांनी वाई बसस्थानकाची स्वच्छता करून वाईकरांना स्वच्छतेचे महत्त्व कामातून पटवून दिले. यावेळी आगार व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.