शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बदली प्रकरणातून संतप्त कामगार-व्यवस्थापन अधिकाऱ्यांत जोरदार हाणामारी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:24 IST

परस्परविरोधी तक्रार 

कोरेगाव : सातारा रोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड फाउंड्री डिव्हिजनमधील कामगारांची वालचंदनगर शाखेकडे बदली केल्यामुळे संतप्त कामगार आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री सव्वा वाजता दोन वेगवेगळे परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड फाउंड्री डिव्हिजनमधील अधिकारी इंद्रजीत वसंतराव हांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या बिझनेस ऑफिसमध्ये आमची बदली कोणाला विचारून केली? या कारणावरून चिडून जाऊन बुधवारी दुपारी चारच्या सुमारास वैभव सदाशिव फाळके, विशाल प्रकाश फाळके आणि मनोज बाजीराव फाळके यांनी शिवीगाळ केली. वैभव फाळके यांनी लाकडी खुर्ची उचलून माझ्या डाव्या बरगडीवर मारली.मनोज फाळके, विशाल फाळके यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.माझे सहकारी विशाल बाळासाहेब गायकवाड हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही या तिघांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विशाल फाळके यांनी तुम्ही उद्यापासून कामावर आला तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली आहे.वैभव सदाशिव फाळके यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, विशाल गायकवाड, इंद्रजीत वसंतराव हांडे यांनी कंपनीच्या बिजनेस ऑफिसमध्ये ट्रान्सफर ऑर्डर केली असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन त्यांना व मनोज बाजीराव फाळके आणि विशाल प्रकाश फाळके यांना तुम्हाला जिवंत सोडत नाही, अशी धमकी देत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत खाली पडल्याने विशाल गायकवाड यांनी मला ऑफिसमधील लाकडी खुर्ची अंगावर फेकून मारली. त्यामध्ये माझ्या उजव्या पायाच्या तळपायास जखम झाली आहे. उजव्या कानाच्या वरच्या बाजूस मुका मार लागला असून, ओठाच्या खालच्या बाजूस जखम झाली आहे.दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन साळुंखे आणि हवालदार शिंदे तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस