शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

नागरिकांकडून काटकसरीच्या अपेक्षा ‘पाण्यात’

By admin | Updated: May 11, 2017 23:12 IST

नागरिकांकडून काटकसरीच्या अपेक्षा ‘पाण्यात’

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : तालुक्यात सध्या अनेक गावांत पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर असल्याने पाण्यासाठी तेथील लोकांना वणवण भटकावे लागत आहे. तेथील लोकांकडून पाण्याचा मोठ्या काटकसरीने वापर केला जात आहे. मात्र, या उलट शहरातील सुशिक्षित वर्गातील लोकांकडून अतिरिक्त वापर केला जात आहे. अशा सुशिक्षित लोकांकडून पाण्याची नासाडी केली जात असल्याने त्यांच्यात पाणी बचतीबाबत जागृती करणे गरजेचे आहे. दुष्काळ मानगुटीवर बसला असताना जिल्ह्यातील एका तालुक्यातील शहरवासीयांना मात्र याची जाणीव अजून झालेली दिसून येत नाही. सर्रासपणे रस्त्यावर गाड्या धुण्यासाठी पाणी वापरून शासनाच्या विद्युत मोटार वापरू नये, या नियमांना धाब्यावर बसविले जात आहे. नियमांना पायदळी तुडविण्याचे काम सध्या कऱ्हाडकरांकडून केले जात आहे.कृष्णा-कोयना नदीमुळे कऱ्हाड शहरास मुबलक पाणीपुरवठा होतो. कऱ्हाडला कोयना नदीतून पाणी उचलून पाणीपुरवठा केला जातो. दिवसाला एक कोटी ४३ लाख ५० हजार लिटर्स पाणी उचलून ते शुद्ध करून ते शहरातील नागरिकांना वितरित केले जाते. वर्षभरासाठी कोयना नदीतील ५.२५ दशलक्ष घन लिटर्स पाणी कऱ्हाड पालिकेसाठी आरक्षित केले जाते. शहरात सध्या पाणी बचतीबाबतच्या नगरपालिकेच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन केले जात आहे. मात्र याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहे ना प्रशासन. कऱ्हाड शहराला दिवसांतून दोनवेळा पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये सकाळी साडेसात ते आठ तसेच सायंकाळी सात ते आठ अशा त्या वेळा आहेत. शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बाराडबरी परिसरामध्ये पालिकेकडून चोवीस तास पाणीपुरवठा योजना उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या पाणीपुरवठा योजनेचेही काम अपूर्णावस्थेत आहे. सध्या या योजनेसाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम शहरात ठिकठिकाणी सुरू आहे.शहरात पालिकेकडून पाणी सोडल्यास घरगुती तसेच अपार्टमेंटमधील लोकांकडून विद्युत मोटारी लावून पाण्याचा उपसा केला जात आहे. विद्युत मोटारी लावून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उपसा करून दररोज हजारो लिटर पाणी गटारात वाया घालविले जात आहे. या प्रकाराबाबत पालिकेला माहिती नसेल एवढे नवलच दिवसाढवळ्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे प्रकार पालिका कर्मचारी डोळ्यांनी पाहत असूनही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाण्याच्या नासाडीबाबत नागरिकांबरोबर पालिकाही जबाबदार असल्याची म्हणावे लागेल. पाण्याचा काटकसरीनेच वापर हवामुबलक प्रमाणात पाऊसमान असलेल्या भागातही यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. कृष्णा-कोयनेच्या काठी असलेल्या कऱ्हाड शहराला पाण्यासाठी चोवीस तास पाणी योजना बांधावी लागत आहे. पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास भविष्यात त्याचा नागरिकांनाच उपयोग होणार आहे. त्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर थांबवून गरजेपुरतेच पाणी वापरणे फायद्याचे ठरेल.शहरातील दिनचर्येचा विचार केला तर छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पाण्याची मोठी नासाडी होते. अपार्टमेंटसह इमारतींमधील पाण्याची टाकी भरण्यासाठी रात्री सुरू केलेली मोटार सकाळपर्यंत सुरूच असते. रात्रीत हजारो लिटर चांगले पाणी केवळ योग्यवेळी मोटार बंद न केल्याने गटारीत मिसळते.