शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हुशार चव्हाणांनी आता दिल्लीला जावं..! चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:22 IST

‘पृथ्वीराज चव्हाण हे हुशार राजकारणी आहेत. दिल्लीतलं दरबारी राजकारण त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनी काँगे्रसची मरगळ थांबवण्यासाठी दिल्लीत जावं

ठळक मुद्देपालिकेच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला ; मलकापुरात भाजप कार्यकर्ता मेळावा

कऱ्हाड/मलकापूर : ‘पृथ्वीराज चव्हाण हे हुशार राजकारणी आहेत. दिल्लीतलं दरबारी राजकारण त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनी काँगे्रसची मरगळ थांबवण्यासाठी दिल्लीत जावं, उगाच पालिकेच्या भानगडीत पडू नये,’ असा टोला मारत ‘कऱ्हाडात पालिकेच्या निवडणुकीत काय अवस्था झाली? याच्यातून त्यांनी बोध घ्यावा,’ असा टोला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

मलकापूर, ता. कऱ्हाड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, अशोकराव थोरात, माजी नगराध्यक्ष शारदा खिलारे, पै. धनाजी पाटील, मोहनराव जाधव यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होेते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जणांची मक्तेदारी भाजपने मोडीत काढली आहे. त्याप्रमाणेच मलकापुरातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी येथील जनता सज्ज झाली आहे. त्यामुळे येथील सत्ताधाऱ्यांनी विश्रांती घेतलेली बरी होईल. ज्या पृथ्वीबाबांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली; पण लॉटरी लागल्यावर सुद्धा हा माणूस सुधारला नाही. त्यांनाराज्य नीट चालवता आलं नाही.साधी कऱ्हाडात सत्ता आणता आली नाही, अशा हुशार बाबांनी काँगे्रस बळकट करण्यासाठी दिल्लीलाच जाणे योग्य.’

डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘कृष्णा उद्योग समूहानं मलकापूरला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम केले आहे. मात्र, काहींना हे पचत आणि रुचत नसल्याचे दिसते. त्यामुळे येणारी मलकापूरची निवडणूक कमळाच्या चिन्हावरच लढणार आहे. कऱ्हाडात भाजपचा नगराध्यक्ष झाल्यापासून उलटी गणती सुरूच झाली आहे. हे विरोधकांनी लक्षात घ्यावे आणि आम्हाला नैतिकतेचे धडे शिकविण्यापेक्षा कडेगाव-पलूस विधासभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत भाजपानं जपलेली नैतिकता समजून घ्यावी.’

या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विविध मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मलकापुरातील भ्रष्टाचारांची चौकशीअशोकराव थोरात यांनी आपल्या भाषणात मलकापुरात झालेल्या वेगवेगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची यादी मंत्री पाटील यांच्यासमोर मांडली. तोच धागा पकडत पाटील यांनी मलकापुरातील भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल. त्यासाठी जबाबदार असणाºया प्रत्येकाला त्यांची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला.मनोमिलनाची ठिणगी मलकापुरातून निघालीज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण हे चमत्कारिक नेतृत्व आहेत. मदत करणाºयांना कसं गाडायचं हे त्यांच्याकडून शिकायचं, असं सांगत दक्षिणेत एकजण म्हणतोय मी उभा राहणार नाही. तर दुसरा म्हणतोय मीच काँगे्रसचा उमेदवार आणि तिसरा म्हणतोय रयत संघटनेचाच आमदार होणार! मात्र, हे त्रांगड एका बाजूला दिसत असतानाच मलकापुरातून मात्र मनोमिलनाची ठिणगी निघाली आहे. राज्यात आणि देशात सत्ता नसल्याने खूप तडफडत असली तरी आमचा भिडू नक्की निवडून येणार, असे त्यांनी डॉ. अतुल भोसलेंकडे पाहत सांगितले. त्याला उपस्थितांनी दाद दिली.नैतिकतेच्या गप्पा मारू नका !नगरपालिकेला आम्ही विरोध करतो, अशी टीका जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. खरंतर या मागणीसाठी तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना भेटला असाल; पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय; पण यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण साडेतीन वर्षे मुख्यमंत्री असताना नगरपालिका करण्यासाठी तुम्ही काय झोपला होता काय? असा सवाल करीत उगाच नैतिकेच्या गप्पा मारू नका, असा टोला डॉ. अतुल भोसले यांनी विरोधकांना लगावला.मदनदादा आणि अतुलबाबा मलकापूरच्या निवडणुकीत चांगलीच बॅटिंग करतील, असा विश्वास व्यक्त करत शेखर चरेगावकर म्हणाले, या निवडणुकीत मला नाईट वॉचमनची जबाबदारी दिली तरी ही मी ती पार पाडेन. शिवाय कºहाडचं राजकारण कसं बिघडलं? याच ज्या पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर अद्याप सापडलं नाही. त्यांना कर्नाटकाच्या निवडणुकीत काय चुकलं? याच उत्तर कसं सापडणार? असा सवाल करीत त्यांनी उगाच मलकापूरची प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या भानगडीत पडू नये, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरchandrakant patilचंद्रकांत पाटील