चायनिज भाजीपाला अन् जडीबुटीची भुरळ

By Admin | Updated: April 24, 2016 23:41 IST2016-04-24T21:58:45+5:302016-04-24T23:41:48+5:30

दौलत कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २८ किलोचा डांगर भोपळा, ७ किलोच्या कलिंगडाने वेधले लक्ष

Chinese vegetable and herb petals | चायनिज भाजीपाला अन् जडीबुटीची भुरळ

चायनिज भाजीपाला अन् जडीबुटीची भुरळ


राज्य शासन कृषी विभाग, बाळासाहेब देसाई साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाटण दौलतनगर येथील दौलत कृषी प्रदर्शनात १५० पेक्षा जादा स्टॉल्स् उभे आहेत. यामध्ये चायनिज भाजीपाला, जडीबुटी, कार, दुचाकी, ट्रॅक्टर आणि विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन बघावयास मिळत आहे.
पंचायत समितीच्या कृषी विभागाने पाटण तालुक्यातील व जिल्ह्याच्या इतर भागातील प्रगतशील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या नावीण्यपूर्ण शेती उत्पादनाची मांडणी लक्ष वेधून घेत होती. यामध्ये २८ किलो डांगर भोपळा, चेरी टोमॅटो, चायनिज कोथिंबिर, तुल्स कांदा, रेड कॅबेज (कोबी) आदींसह कोकिसरे गावचा हापूस आंबा ७ किलो वजनाचे कलिंगड, फणस आदी शेतमालाचा समावेश आहे.
प्रदर्शनात आवळा कॅन्डी, सेंद्रिय तांदूळ, तेलाशिवाय तयार करण्यात येणारे पापड, पॉपकॉर्न मशिन्स बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
दि. २३ ते २५ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. कोयता, विळे, जायफळ, विविध जातींचे तांदूळ, शेवगा, आले, ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत करावयाची पाणलोट विकासाचे मॉडेल्स सेंद्रिय गूळ, काकवीसह अनेक वस्तू प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे.

१० ते ७५ हजार रुपयांची रायफल
सातारा येथील राजपूत गन हाउसने लायसन्सशिवाय बंदुका व रायफल्स, पिस्तूलचा स्टॉल मांडला आहे. या बंदुका शेती पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राणी व इतर पशुपक्ष्यांची शिकार करणाऱ्या आहेत. त्यांची कींमत दहा हजारांपासून ते ७५ हजार रुपये इतकी आहे. आरोग्य विभाग व शिक्षण पशुवैद्यकीय विभाग यांचेही स्टॉल्स् कृषी प्रदर्शनात होते. पाटण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी मरळीच्या माळावरील कृषी प्रदर्शनास भेट देत आहे.

Web Title: Chinese vegetable and herb petals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.