शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुलं वाचतात चक्क संस्कृतची पुस्तकं!

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

चिमुरडे हात अनुभवताहेत ग्रंथस्पर्श : अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

जावेद खान-- सातारा -केवळ दूरचित्रवाहिन्यांसमोर बसून भावी पिढी घडणार नाही. त्यातच मोबाईल, व्हिडिओ गेमसारखे अनेक माध्यमं त्यांचं लक्ष विचलित करत आहेत. भावी पिढी विचारसंपन्न व्हायची असेल तर तिला ग्रंथवाचनाचे बाळकडूच मिळायला पाहिजे. हाच धागा पकडून रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने ‘वर्गग्रंथ’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने चिमुरड्या हातांना ग्रंथस्पर्श लाभत आहे.प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करते, याला अनुसरून येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने गेल्यावर्षीपासून ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम राबविला आहे. यासंदर्भात माहिती देताना प्राथमिकचे मुख्याध्यापक कमलाकर महामुनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘सध्या टीव्ही, मोबाईलमुळे मुलांची वाचनासंबंधीची आवड कमी होत आहे. मोबाईलवर तासंनतास गेम खेळत बसल्यामुळे मुलांचा शैक्षणिक विकासही खुंटत आहे. त्यांच्यात वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक वर्गात ग्रंथालयांची निर्मिती केली आहे.’यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच इंग्रजी, मराठी शब्दकोश, ललित लेखन, बालकथा, संतांची साहित्य संपदा, थोरामोठ्यांची चरित्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज दोन तास विद्यार्थी वाचन करतात. त्यानंतर वाचलेल्या ग्रंथांसंदर्भात चर्चा घडवून आणली जाते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव मिळत आहे. या वाचनामुळे स्पर्धा परीक्षेबरोबर भाषांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होऊ लागली आहे. ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम कर्मवीर विद्या प्रबोधनीतर्फे चालविले जात आहे. त्याचे नियोजन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी असते. या उपक्रमात सध्या रयत गुरुकुल सुरू आहे. विविध विषयांवर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कल-चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास, सहशालेय उपक्रम, क्षेत्रभेट, विज्ञान सहलीचे नियोजन अशी अनेक उपक्रम विद्यालय राबवित आहे. मला वक्ता व्हायचंय...विद्यालयाने आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ‘मला वक्ता व्हायचंय’ या उपक्रमांतर्गत वक्तृत्वाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आठवड्यातून किमान एक तास मार्गदर्शन केले जाते. त्यांना विविध विषयांवर बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तम वक्त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित दाखविली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढणार आहे.२५ वर्गांमध्ये ३५ ग्रंथगेल्यावर्षीपासून सुरू केलेल्या ‘वर्गग्रंथ’ उपक्रम ३५ वर्गांमध्ये सुरू आहे. यामध्ये सुमारे दोनशे पुस्तके ठेवली आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - कमलाकर महामुनी, मुख्याध्यापक.