शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:40 IST

कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने तो पाण्यात पडल्याचे सांगितले

फलटण (जि. सातारा) : बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाच्या टाकीत पडून साडेतीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी फलटण तालुक्यातील सरडे येथे घडली. मन्वित बापू भोसले असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.दत्तात्रय करडे यांनी सरडे गावात मुख्य रस्त्याच्या बाजूला शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते. शौचालयात सात फुटी खोल टाकी बांधण्यात आली होती. सोमवारी चारच्या सुमारास मन्वित खेळत टाकीजवळ गेला. शौचालयाच्या दरवाजामधून तो थेट टाकीत पडला. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने तो पाण्यात पडल्याचे सांगितले. स्थानिक तरुणाने टाकीतून त्याला बाहेर काढले आणि पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फलटण येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांचा पळघटनेची माहिती मिळताच दत्तात्रय करडे कुटुंबीयांनी गावातून पळ काढला मन्वितचा मृतदेह गावात आणल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. गावचे पोलिस पाटील मनोज मोरे, सरपंच मंदा करडे यांना घटनेची माहिती झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सरडे, ग्रामपंचायतीकडून संबंधित बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

घटनेची नोंद नाहीघटना घडून चोवीस तास झाले तरी घटनेची आकस्मिकमध्ये नोंद नाही. बीट हवालदार शांतीलाल ओंबासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची नोंद नाही बालकावर अंत्यसंस्कार झाले असून, पुढे योग्य ती कार्यवाही करू, असे त्यानी सांगितले.

...अन्यथा बांधकाम पाडणारग्रामपंचायतीकडून संबंधित बांधकामांवर कारवाई न झाल्यास आम्ही बांधकाम पाडणार, असे मन्चितच्या कुटुंबीयांनी सांगितले सोमवारी रात्री मन्वितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Toddler Dies After Falling into Toilet Tank

Web Summary : A three-and-a-half-year-old boy died in Satara's Phaltan after falling into an under-construction toilet tank. MAnvit Bhosle fell into the seven-foot deep tank while playing. Locals retrieved him, but doctors declared him dead at the hospital.