मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 21:56 IST2022-10-28T21:55:36+5:302022-10-28T21:56:37+5:30
Satara News: महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनाही बसला. वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास आज त्यांना अडकून पडावे लागले.

मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या
- अजित जाधव
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनाही बसला. वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास आज त्यांना अडकून पडावे लागले. दीड तासांनंतर त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. मिसेस मुख्यमंत्र्यांनाच जर अडकून पडावे लागत असेल, तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे.
लता शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी येत होत्या. लिंगमळा ते वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी हाेवून तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना अडकून पडावे लागले. वेण्णालेक व परिसरात केवळ दोन कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवत होते. अखेर दीड तासानंतर त्यांची यातून सुटका झाली.