शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
4
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
5
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
6
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
7
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
8
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
9
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
10
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
11
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
12
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
13
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
14
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
15
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
16
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
17
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
18
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
19
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
20
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

महाराष्ट्रातील ‘चेरापुंजी’; सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजला उच्चांकी पाऊस!, किती झाली पावसाची नोंद.. वाचा

By संजय पाटील | Updated: May 28, 2025 16:35 IST

हे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत, हे विशेष.

संजय पाटीलकऱ्हाड (जि. सातारा) : देशातील मेघालय राज्यात असलेले चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, गत काही वर्षांत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या पाथरपुंजमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळतोय. ३१ मे २०२४ पासून आजअखेर पाथरपुंजमध्ये झालेल्या एकूण पावसाच्या नोंदीने चेरापुंजीतील पावसाच्या आकडेवारीचा विक्रमही मोडीत काढलाय. वर्षभरात चेरापुंजीपेक्षा तब्बल १ हजार ४२१ मिलीमीटर जास्त पाऊस पाथरपुंजमध्ये नोंदला गेला आहे.जिल्ह्यात नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. मात्र, गत काही वर्षांत त्यामध्ये बदल होताना दिसत आहे. पाथरपुंजमध्ये पडणाऱ्या विक्रमी पावसाची नोंद सुरुवातीला २०१९ मध्ये केली गेली. त्यावेळी जून ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत पाथरपुंजला ७ हजार ३५९ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती, तर याच कालावधीत चेरापुंजीत ५ हजार ९३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे चेरापुंजीऐवजी पाटण तालुक्यातील पाथरपुंज देशातील सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण म्हणून चर्चेत आले.

३१ मे २०२४ ते २७ मे २०२५ या कालावधीतही पाथरपुंजला उच्चांकी पाऊस नोंदला गेला असून, हा पाऊस राज्यातील सर्वाधिक, तसेच देशातही अग्रेसर असावा. पाथरपुंजमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदला गेला आहे. त्यानंतरही अधूनमधून येथे पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर येथे चेरापुंजीपेक्षा १ हजार ४२१ मिलिमीटर जास्त पाऊस नोंदला गेलाय.

कुठे आहे पाथरपुंज?पाटण तालुक्यात कोयनानगरच्या नैऋत्येला पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून या गावाकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असून, हे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत, हे विशेष.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस