चव्हाण पतसंस्थेची शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसायपूर्ती : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:48+5:302021-03-24T04:36:48+5:30
मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ढेबेवाडी येथील मुख्य ...

चव्हाण पतसंस्थेची शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसायपूर्ती : पाटील
मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ढेबेवाडी येथील मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थापक हिंदुराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम पाटील, संचालक सदाशिव कदम, प्रवीण पाटील, बबनराव सूर्यवंशी, सर्जेराव पाटील, शांताराम पाटील, पांडुरंग पुजारी, दिनकर साखरे, सुरेश मोहिते, जितेंद्र कुंभार, शारदा गरूड उपस्थित होते.
अभिजीत पाटील म्हणाले, संस्थेने नवनवीन उपक्रम राबवून सहकारात वेगळे वलय निर्माण केल्याने संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत चढता राहिला आहे. संस्थेने आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लिअरन्स, एसएमएसद्वारे माहिती, वीज बिल, मिनी एटीएम अशा सुविधा सुरू केल्या आहेत. भविष्यात कोअर बँकिंग करण्याचा संस्थेचा विचार असून त्यादृष्टीने संस्थेची वाटचाल सुरू आहे.
हिंदुराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सरव्यवस्थापक सुहासचंद्र पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष आर. बी. पाटील यांनी आभार मानले. (वा. प्र.)
फोटो : २३केआरडी०४
कॅप्शन : मंद्रुळकोळे, ता. पाटण येथील आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या वार्षिक सभेत वेळेत कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांचा सत्कार करण्यात आला.