शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाडमधील तिघांच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत दोषारोपपत्र दाखल, ग्रामपंचायत सदस्याचा समावेश

By संजय पाटील | Updated: June 12, 2024 16:50 IST

कऱ्हाड : खुनासह तेरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कऱ्हाड शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील टोळीवर मोक्का कायद्याखाली न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याच्या ...

कऱ्हाड : खुनासह तेरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कऱ्हाड शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील टोळीवर मोक्का कायद्याखाली न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याच्या प्रस्तावाला पोलीस महासंचालकांकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले आहे. आरोपींमध्ये हजारमाची, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या सदस्याचा समावेश आहे.टोळीप्रमुख सोम्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ अण्णा अधिकराव सुर्यवंशी, रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी (तिघेही रा. हजारमाची) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाचीचा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सोमा उर्फ  सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर कऱ्हाड शहर व पुणे पोलीस ठाण्यात वैयक्तिक तसेच टोळीने केलेल्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातच  गतवर्षी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात त्याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.त्यामुळे या टोळीविरोधात मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कलमांचा समावेश करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्याची पूर्वपरवानगी मिळण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावाला १० जून रोजी मंजुरी देण्यात आली असून तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कोंडीराम पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक संदीप शितोळे, अमित बाबर, अनिल पाटील तसेच पोलीस अंमलदार असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, सागर बर्गे, दीपक कोळी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस