शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

विटांनीच भरलं नदीचं पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:57 IST

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा ...

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा नदी उपळवे, दालवडी, मांडवखडक, कुरवली, तावडीमार्गे फलटण शहराच्या माध्यमातून प्रवेश करत पुढे कांबळेश्वर, सोमंथळीजवळ नीरा नदीला मिळते. बाणगंगा कधीकाळी चार महिने वाहत होती. आपल्या परिसंस्थेवर ती अनेकांना जगवत होती. शेती, पशुपक्षी यांना वरदान ठरत होती. मोठा पाऊस झाल्यावर ती तिचं अस्तित्व सिद्ध करते.बाणगंगा नदीच्या दुर्लक्षामुळे तिची नैसर्गिक प्रकृती हरवत चालली आहे. पद्मावती मंदिर परिसरातून नदी फलटणकडे धाव घेते. येथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. फलटण झपाट्याने वाढत आहे. उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. जुन्या इमारतींचा राडा रोडा दगड, वीट, माती टाकण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बाणगंगेचं पात्र असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे नदीचे पात्र अडवले जात आहे. पात्र अरुंद होत आहे. या घाणीमुळे पावसाळ्यात पाणी व्यवस्थित पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. परिणामी दुसऱ्या बाजूने पात्र विस्तारताना दिसते. यामुळे नदीपात्राशेजारील घरांना धोका निर्माण करतो. शनी मंदिराजवळ असणारा परिसर धोक्यात आहे.प्रशासनाची डोळेझाकबाणगंगेचे पात्र पूर्वी बºयापैकी स्वच्छ होते; पण फलटणच्या वाढत्या विस्ताराने बाणगंगेच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभे आहेत. फक्त राडा रोडाच नाही तर अनेक प्रकारची मानवी अतिक्रमने पाहायला मिळतात. प्रशासन डोळ्यावर हात ठेवून आहे. बाणगंगेच्या नैसर्गिक प्रकृतीशी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ नये व तिची जपणूक व्हावी म्हणून आणखी खूप प्रयत्न होणे आवश्यक आहेत.