परिवर्तनशुद्धीचे काम संस्काराचा भाग

By Admin | Updated: January 5, 2015 00:41 IST2015-01-04T22:30:13+5:302015-01-05T00:41:37+5:30

अनिल बडवे : ‘विहिंप’च्या हिंदू संमेलनात मान्यवरांची उपस्थिती

Change is part of Sankara's work of purification | परिवर्तनशुद्धीचे काम संस्काराचा भाग

परिवर्तनशुद्धीचे काम संस्काराचा भाग

सातारा : ‘संपूर्ण देशात कार्यरत असणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्यासुवर्णजयंती वर्षानिमित्त अनेक जिल्हास्तरीय हिंदू संमेलनाचे आयोजन केले जात आहे. सध्या परिवर्तनशुद्धीचे सुरू असलेले काम हे आमच्या संस्काराचा भाग आहे.’ असे मत पंढरपूर येथील अनिल बडवे यांनी व्यक्त केले. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित एक दिवसीय हिंदू संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव होते. बाळ महाराज (इचलकरंजी), नीळकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), आचार्य शिवानंद भारती (अंभेरी), ‘विहिंप’चे क्षेत्रीय सेवाप्रमुख भार्गव सरपोतदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतकार्यवाह विनायक थोरात, हेमंत हरहरे, साताऱ्याचे सुरेंद्र महाराज बिडकर, जयरामस्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल महाराज, पळशी येथील ना. रा. गंबरे, सातारा जिल्हा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव सापते, विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशमंत्री बाबूजी नाटेकर, विजया भोसले, अ‍ॅड. मीनल भोसले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात बाबूजी नाटेकर यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ३७ देशांत झालेला परिषदेचा कार्यविस्तार हा खरोखरच विश्वव्यापी असून, देशातील उपेक्षितांची सेवा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून परिषदेतर्फे पाच हजार सेवा प्रकल्प, ४५ हजार एकल विद्यालये सुरू आहेत. दरवर्षी सुमारे पाच लाख गार्इंना कत्तलखान्याच्या वाटेवरून परत आणले जात आहे, असे सांगितले.
प्रा. व्यंकटेश आबदेव तसेच इतरांचेही यावेळी भाषण झाले. या संमेलनाला जिल्ह्यातून हजारोजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Change is part of Sankara's work of purification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.