महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील कारला अपघात, वडोली भिकेश्वर येथिल घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 19:41 IST2018-03-10T19:41:32+5:302018-03-10T19:41:32+5:30
महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील कारला अपघात, वडोली भिकेश्वर येथिल घटना
कऱ्हाड- माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अंत्यविधीसाठी कडेगावकडे निघालेले महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला. समोरून येत असलेला ऊस वाहतूक ट्रॅक्टरसह मिनीबसला कार धडकली. हा अपघात कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी दुपारी धनकवडी, पुणे येथून खासगी हॅलिकॉप्टरने सांगलीला व तेथून वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना स्थळावर अंत्यविधीसाठी नेण्यात आले. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कारने अंत्यविधीसाठी निघाले होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा वडोली भिकेश्वरच्या हद्दीत आला असताना एका एस्कॉर्ट कार (एमएच २० ईई १९५३) ची समोरून आलेल्या ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर व मिनीबसला धडकली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर काही वेळातच मंत्री पाटील हे पुढे वांगीकडे रवाना झाले.