जनशक्तीच्या सभापतींनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST2021-01-16T04:42:13+5:302021-01-16T04:42:13+5:30
लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, शारदा जाधव यांची स्थायी समितीत वर्णी लागली आहे. बांधकाम सभापतीपदी ...

जनशक्तीच्या सभापतींनी स्वीकारला पदभार
लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, शारदा जाधव यांची स्थायी समितीत वर्णी लागली आहे. बांधकाम सभापतीपदी हनुमंत पवार, आरोग्य समितीवर विजय वाटेगावकर, महिला समितीवर स्मिता हुलवान, नियोजन समितीच्या सभापती पदावर सुप्रिया खराडे व पाणी पुरवठा समितीवर अरुण पाटील यांची निवड झाली. त्यापैकी बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, नियोजन समितीवर जनशक्तीच्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. या सभापतींनी पदभार स्वीकारला.
यावेळी जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव म्हणाले की, जनशक्ती आघाडीने गत चार वर्षात लोकाभिमुख कारभार करताना दिलेले शब्द व जाहीरनाम्यातील कामे मार्गी लावली आहेत. उर्वरित काळातही चोवीस तास पाणी योजनेसह भुयारी गटार या महत्त्वाकांक्षी योजनांचा लोकार्पण सोहळा घेणार आहोत. लोकाभिमुख कारभार करताना जनशक्ती आघाडीने नेहमी शहराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे पुरस्कार स्वीकारणारे कऱ्हाड शहर यंदा ‘हॅटट्रिक’ साधणार आहे. पालिकेच्या सभापतीपदावर अनुभवी चेहरे दिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून जनशक्तीने केलेला कारभार लोकाभिमुख ठरला आहे. शहर कचरामुक्त होत आहे. पालिकेला शासनाने वसुंधरा पुरस्काराने गौरविले आहे. नदी स्वच्छता, कारंजे असे अनेक प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. यासाठी यापुढच्या काळात कार्यरत राहणार आहे.
फोटो : १५केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड पालिकेच्या विविध सभापतींनी नुकताच पदभार स्वीकारला. स्थायी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शारदा जाधव, राजेंद्र यादव व सौरभ पाटील यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला.